party workers Bacchu Kadu
Bacchu Kadu Facebook
Bacchu Kadu Twitter

बातमी व घडामोडी

PHOTOS

image
image
image
image
image
image
image

Videos

शहीदांच्या वीर पत्नी व विरमाता सत्कार सोहळा औरंगाबाद ना. बच्चू कडू|| Martyr Family Award Function

State Minister
Founder and President Of Prahar Janshkati Party, Fourth Time MLA From Achalpur Constituency.
1 of 61 Next
Bacchu Kadu

व्यक्तिगत परिचय

ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू ( जन्म : ५ जुलै १९७०) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून (जि. अमरावती) सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. युवकांचे संघटन करुन शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत.

आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ ३० डिसेंबर २०१९ रोजी घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये ते `बच्चूभाऊ` या नावाने लोकप्रिय असून “अपना भिडू बच्चू कडू“ ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे.