Media

पालकमंत्री आले अन् त्यांच्या व्यथांना लागला ब्रेक जीएमसीतील जेवणाचा दर्जा उंचावला

पालकमंत्री आले अन् त्यांच्या व्यथांना लागला ब्रेक जीएमसीतील जेवणाचा दर्जा उंचावला :  प्रशासन आले रुळावर
अकोला, ता.११ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जावर रुग्णांकडूंन प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यानंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी सर्वोपचार रुग्णालयात धाव घेऊन जेवणाची तपासणी केली. दरम्यान त्यांनी भोजनाचा दर्जा सुधारण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यांच्या या सूचनेचे तत्काळ अंमलबजावणी करीत प्रशासनाने रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा उंचावल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख चढता आहे. ही परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी पालकमंत्री बच्चू कडू हे सर्वच विभागाचा युद्धपातळीवर आढावा घेत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयांमध्ये रुग्णांना चांगले जेवण मिळत नसल्याची बाब पुढे आली होती. वार्डात वेळेवर सकाळचा चहा पोहोचत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला होता. हा विषय पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कानावर जाताच त्यांनी बुधवारी (ता.१०) सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान त्यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा तपासला. कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आवश्यक आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवली तरच कोरोनाला हरवले जाऊ शकते, असे तज्ञांच्या निष्कर्षातून पुढे आले आहे. ही बाब लक्षात घेता रुग्णांना सकस आहार मिळणे गरजेचे असल्याची बाब पालकमंत्र्यांनी जीएमसी प्रशासनाला ळलक्षात आणून देत रुग्नांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा तत्काळ सुधारण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांना दिले होते. त्यानंतर प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या या आदेशाची दखल घेत गुरुवारीच (ता.११) भोजनाचा दर्जा उंचावल्याचे पहायला मिळाले. पालकमंत्र्यांनी सुचवलेले विविध बदलही जीएमसी प्रशासनाने केले आहेत. त्यामुळे आता रुग्णांना निश्चित दिलासा मिळेल.

READ MORE
Media

संकटाच्या काळात एकत्र येऊन काम करण्याची गरज पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे आयएमएच्या बैठकीत प्रतिपादन

कोरोना चे संक्रमण हा अभूतपुर्ण अशा संकटाचा काळ आहे. हे संकट वैश्विक आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन जितके महत्त्वपूर्ण आहे तितकेच वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर्सही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या संकटकाळात आपण सारे एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केले. येथील इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या सभागृहात आज पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी सर्व सभासदांना संबोधित केले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच आयएमए चे पदाधिकारी उपस्थित होते.

ना. कडू याप्रसंगी म्हणाले की, वैद्यकीय उपचार हा या संकटाला थोपवण्यातला महत्त्वाचा भाग आहे. ते काम डॉक्टरच करु शकतात. प्रशासन आणि शासकीय आरोग्य यंत्रणा ही हे संकट थोपविण्यासाठी सर्वात पुढे आहे. मात्र यात आपल्या सारख्या वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांची, त्यांच्या अनुभवाची जोड मिळाली की मग या संकटाचा मुकाबला अधिक जोमाने करता येईल,असे प्रतिपादन करुन त्यांनी डॉक्टर आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे आवाहन केले. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. कमलेश लढ्ढा, डॉ. अनूप कोठारी, डॉ. अमोल केळकर, डॉ. पराग डोईफोडे तसेच अन्य सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

READ MORE
Media

रोग विमाना वाल्यांनी आणला, भोगत जमिनीवरचे लोक आहेे..

काल कामानिमित्त अकोला जाण्याचे काम पडले व दिवसभराचे काम आटोपल्यावर रात्री ९ वाजता मूर्तिजापुर नागपूर हायवेनी आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. काही अंतर समोर आल्यावर २० ते २५ सायकली घेऊन तरुण दिसले. बच्चू भाऊनी गाडी थांबवायला सांगितली, गाडी थांबली व विचारपुस केल्यावर कळले झारखंडचे मजुर नाशिक येथे शेतीत काम करणारे. घरी जाण्यासाठी सायकलने निघाले आहे. नाशीक ते मूर्तिजापुर ४५० किमी अंतर पार केले. पुढे १२०० किमी अंतर बाकी, मला तर ऐकुन धक्काच बसला. त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला की दोन दिवसात मजुराकरीता वाहतूक व्यवस्था होणार परंतु त्यांची ऐकण्याची मनस्थिती नव्हती.

रात्रीची जेवनाची व राहण्याची व्यवस्था व त्यांच्या सोबत दोन दिवसाचा डब्बा आमचे मित्र अंकीत अग्रवाल यांनी दिला. मजुरांनी सांगितले की स्वयंपाक बनविण्याचे ५ दिवसात काम नाही पडले महाराष्ट्रात ठिकठिकाणी लोक मदत करत आहे. काही अधिकार्यांना मदति करीता फोन करून आमचा ताफा पुढे निघाला.

एक तरुण पैदल जाताना भेटला. पोलीसांचा ताफा पाहुन त्याला भिती वाटली व पळण्याचा प्रयत्न केला त्यांना समजुन सांगतले तेव्हा तो आला. त्याचा प्रवास बघून सर्वजण अवाक झाले. मुंबई वरुन महिन्या अगोदर पैदल निघालेला हा तरुण हैद्राबाद जाण्यासाठी निघालेला आहे. व अचानकच बच्चू भाऊ बोलले “रोग विमाना वाल्यांनी आणला, भोगत जमिनीवरचे लोक आहेे.” त्याला मदत केली व ताफा पुढे गेला.

आज दिवसभराचे काम आटोपुन मि गावला परत येण्याकरिता निघालो. माझ्या गावाजवळ जवळा येथे ४० ते ५० लोक पैदल भेटले. कुठे जात आहे विचारल्या वर बोलले नांदेड वरुन निघालो बिहार जायच आहे. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आज एक गाडी तेलंगणा वरुन गेली परंतू ऐकण्याची त्यांची मनस्थिती नाही. शेवटी आमचे मित्र नितीन मिर्झापुरे, यवतमाळ याला संपर्क करुन त्यांची यवतमाळला जेवण्याची व्यवस्था करण्याचे सांगितले.

लॉकडाऊन मध्ये आपण घरात असल्याने बाहेरचे जग जास्त बघायला मिळत नाही आहे परंतु घराबाहेर जे काही घडत आहे ते नक्की बघण्यालायक नाही..

अमित वानखडे पाटील

READ MORE
Bacchu KaduMedia

चला चूल पेटवूया; राज्यमंत्री बच्चू कडूंनी दिला स्तुत्य कार्यक्रम

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी करण्यात आलं आहे. याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रात रोजंदारीवर असलेल्या कामगारांच्या जीवनावर झाला आहे. त्यानंतर देशभरातील दिग्गज मंडळींनी कोरोना विरोधात लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मोठी आर्थिक मदत केली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील कोरोना विरोधात लढण्यासाठी ‘चला चुल पेटवु’ असा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती ते 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या दरम्यान गरजू लोकांना जेवण, धान्य किंवा जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहे.

1 ते 5 या वेळात आपल्या घरी जे जेवण शिजतं ते द्या. जेवण देता येत नसेल तर धान्य किंवा एका कुटुंबाला200 ते 500 रूपये आर्थिक मदत देऊन उपाशी घरातील चूल पेटवा, असं आवाहन बचचू कडू यांनी केलं आहे.

नियम आणि अटिचे पालन करून हा उपक्रम राबवायचा आहे. कृपया गर्दी करु नये आणि लोकांनी एकत्र येऊन हा उपक्रम करायचा नाही आहे, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.

 

READ MORE