मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी करण्यात आलं आहे. याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रात रोजंदारीवर असलेल्या कामगारांच्या जीवनावर झाला आहे. त्यानंतर देशभरातील दिग्गज मंडळींनी कोरोना विरोधात लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मोठी आर्थिक मदत केली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील कोरोना विरोधात लढण्यासाठी ‘चला चुल पेटवु’ असा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती ते 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या दरम्यान गरजू लोकांना जेवण, धान्य किंवा जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहे.

1 ते 5 या वेळात आपल्या घरी जे जेवण शिजतं ते द्या. जेवण देता येत नसेल तर धान्य किंवा एका कुटुंबाला200 ते 500 रूपये आर्थिक मदत देऊन उपाशी घरातील चूल पेटवा, असं आवाहन बचचू कडू यांनी केलं आहे.

नियम आणि अटिचे पालन करून हा उपक्रम राबवायचा आहे. कृपया गर्दी करु नये आणि लोकांनी एकत्र येऊन हा उपक्रम करायचा नाही आहे, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.