काल कामानिमित्त अकोला जाण्याचे काम पडले व दिवसभराचे काम आटोपल्यावर रात्री ९ वाजता मूर्तिजापुर नागपूर हायवेनी आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. काही अंतर समोर आल्यावर २० ते २५ सायकली घेऊन तरुण दिसले. बच्चू भाऊनी गाडी थांबवायला सांगितली, गाडी थांबली व विचारपुस केल्यावर कळले झारखंडचे मजुर नाशिक येथे शेतीत काम करणारे. घरी जाण्यासाठी सायकलने निघाले आहे. नाशीक ते मूर्तिजापुर ४५० किमी अंतर पार केले. पुढे १२०० किमी अंतर बाकी, मला तर ऐकुन धक्काच बसला. त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला की दोन दिवसात मजुराकरीता वाहतूक व्यवस्था होणार परंतु त्यांची ऐकण्याची मनस्थिती नव्हती.

रात्रीची जेवनाची व राहण्याची व्यवस्था व त्यांच्या सोबत दोन दिवसाचा डब्बा आमचे मित्र अंकीत अग्रवाल यांनी दिला. मजुरांनी सांगितले की स्वयंपाक बनविण्याचे ५ दिवसात काम नाही पडले महाराष्ट्रात ठिकठिकाणी लोक मदत करत आहे. काही अधिकार्यांना मदति करीता फोन करून आमचा ताफा पुढे निघाला.

एक तरुण पैदल जाताना भेटला. पोलीसांचा ताफा पाहुन त्याला भिती वाटली व पळण्याचा प्रयत्न केला त्यांना समजुन सांगतले तेव्हा तो आला. त्याचा प्रवास बघून सर्वजण अवाक झाले. मुंबई वरुन महिन्या अगोदर पैदल निघालेला हा तरुण हैद्राबाद जाण्यासाठी निघालेला आहे. व अचानकच बच्चू भाऊ बोलले “रोग विमाना वाल्यांनी आणला, भोगत जमिनीवरचे लोक आहेे.” त्याला मदत केली व ताफा पुढे गेला.

आज दिवसभराचे काम आटोपुन मि गावला परत येण्याकरिता निघालो. माझ्या गावाजवळ जवळा येथे ४० ते ५० लोक पैदल भेटले. कुठे जात आहे विचारल्या वर बोलले नांदेड वरुन निघालो बिहार जायच आहे. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आज एक गाडी तेलंगणा वरुन गेली परंतू ऐकण्याची त्यांची मनस्थिती नाही. शेवटी आमचे मित्र नितीन मिर्झापुरे, यवतमाळ याला संपर्क करुन त्यांची यवतमाळला जेवण्याची व्यवस्था करण्याचे सांगितले.

लॉकडाऊन मध्ये आपण घरात असल्याने बाहेरचे जग जास्त बघायला मिळत नाही आहे परंतु घराबाहेर जे काही घडत आहे ते नक्की बघण्यालायक नाही..

अमित वानखडे पाटील